Thursday, 2 March 2017

९-क्याचमेंट एरिया डेव्हलपमेंट (समृद्ध — शिवार जल योजना)

1
   
2

९-क्याचमेंट एरिया डेव्हलपमेंट  (समृद्धशिवार जल योजना)

मुख्य मुद्दे :-

१)        जमिनीचे टेरेसिंग किंवा लेव्हलिंग – डोंगर उताराच्या जमिनीवर मोठ्या लांबी रुंदीच्या क्षेत्राचे सपाटी करण करणे अशक्य असते. म्हणून तेथे कमी रुंदीचे व ज्यास्त लांबीचे, क्वचित प्रसंगी काहीसे डोंगराच्या गोलाईला समांतर टेरेस किंवा माळे तयार केले जातात. त्यालाच एका पुढे एक समांतर माळे करणे, असे म्हणतात. अति डोंगराळ भागात ही पद्धत वापरतात.


२)  भूमिगत व भूपृष्ठावर छोटे मोठे बंधारे बांधल्यास पाणी साठे वाढून सिंचन क्षेत्र वाढवता येईल.
)        नाला ट्रेनिंग :- आगगाडी ज्या प्रमाणे रुळावरून किंवा रुळाच्याच  दिशेने चालते त्याच प्रमाणे एखाद्या नाल्याला उथळ असल्याने वाटेल तिकडे पसरू न देता त्याचे पात्र खोदून खोल केल्यास पाऊसाचे पाणी त्यातूनच वाहत जाईल व मुरात पण जाईल. त्याच्या दोन्ही बाजूची धूप थांबेल. तसेच नाला क्षेत्र कमी झाल्याने पिक क्षेत्र वाढेल. अति छोटे नाले शेतातच सपाट करून शेतात विलीन करावेत, म्हणजे पाणी जमिनीत मुरुन ओलावा व गारवा वाढेल. पीकाकरिता योग्य वातावरण तयार होते.   

४)   नाल्याचा गाळ काढणे :- गाळ काढून नाला पात्र खोल केल्यास पाणी मोठ्या प्रमाणात नाल्यातून वाहील व जिरेल सुद्धा. गाळ काढल्याने नाला तळाची सद्छीद्रता वाढून पाणी मुराण्याचे प्रमाण वाढते व तोच गाळ शेतात टाकल्यास जमिनीचा पोत/प्रत वाढतो.
५)   शेत जमिनीचा म्हणजेच मातीचा थर कमी जाडीचा असल्यास व त्या खाली सलग / अखंड टणक अग्निजन्य खडक असल्यास त्या खडकात ठीक ठिकाणी बोअर करून जमिनीतच आतल्या आत सुरुंग लाऊन अखंड खडक विदीर्ण करावा. त्यामुळे त्या जमिनीची जल धारण शक्ती वाढते.
६)   कोल्हापूर प्रकारचे बंधारे नाल्यांवर ठीक ठिकाणी बांधून तेथील पाणी थेट शेतात नेता येते. त्यामुळे सिंचन  क्षेत्र वाढते.
७)   उपयुक्त वृक्षांच्या बागा / फळ बागा ची लागवड केल्यास कमी पाण्यावर जास्ती उत्पादन मिळू शकते. उदा. पेरू, आंबा, जाम्बुळ, सीताफळ, चिक्कू, शेवगा, आवळा इ..त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून पर्ज्यण्यमान वाढू शकते.
८)   समांतर चर :- डोंगर उतरणीवर एकमेकांना समांतर चर (सी.सी.टी.)  खोदल्यास डोंगर उतारावरील पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवले जाईल व जिरले जाईल. त्यामुळे वनीकरणाचे रक्षण होईल. वन्य पशु पक्षांना पाणी काही प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल.  
९) .  कमी पाण्यावर येणारी पिके / बियाणे वापरल्यास कमी सिंचनात सुद्धा उत्पादन वाढू शकते
                               
                               ---xxx---
  



                    

3 comments:

  1. सर नमस्कार
    मी पाणी व्यवस्थापन या विषयावर येणारा दिवाळी विशेषांक प्रकाशित करणार आहे, आपण या विशेषांकात आपला लेख द्यावा म्हणजे आम्ही तो प्रकाशित करु.
    सोबत आपला फोटो व बायोडाटा पण द्या म्हणजे आपल्या नावासहित आम्ही प्रकाशित करु.
    धन्यवाद
    व्हाटसप 8830812450
    email- samrudhvyapar2014@gmail.com

    ReplyDelete